तोच चन्द्रमा नभात – भाग ७

तोच चन्द्रमा नभात – भाग ७
 चन्द्राची उपासना

अनादिकालापासून निसर्गातील सर्व अद्भुत शक्ती आणि चमत्कार यांकडे माणूस भीतीयुक्त आदराने पहात आला आहे. नवग्रहांना देवता मानून त्यांची पूजा करण्याची परंपरा अशीच प्राचीन कालापासून चालत आली आहे. तेजोनिधी सूर्यनारायणाला अर्थातच अग्रपूजेचा मान, त्यानंतर दुसरा क्रमांक चन्द्राचा लागतो. पण या पहिल्या आणि दुस-यामध्ये महदंतर आहे. सूर्यनमस्कार, अर्घ्य देणे वगैरे प्रकारे सूर्याची उपासना केली जाई, ठिकठिकाणी सूर्यमंदिरे आहेत. चन्द्राबद्दल तसे फारसे कांही  सांगता येणार नाही. मोठ्या देवळांमध्ये कुठेतरी शोभेपुरते एक नवग्रहाचे पॅनेल असते त्यात चन्द्र दिसतो. नवग्रहस्तोत्रामधील पहिले दोन श्लोक असे आहेत.

जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महद्युतिम् । तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम् ।।

दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णवसंभवम् । नमामि शशिनंसोमम् शंभोर्मुकुटभूषणम् ।।

‘महा तेजस्वी, अंधःकाराचा कर्दनकाळ, सर्व पापांचा नाश करणारा’ वगैरे खास विशेषणांनी सूर्याची तोंड भरून स्तुति केल्यानंतर ‘क्षीरसागरातून जन्माला येऊन शंकराच्या मुकुटाला शोभा आणणारा’ अशा सौम्य शब्दात चन्द्राचे  वर्णन केले आहे.  सूर्याचा थाट एखाद्या सम्राटाचा. सात उमद्या घोड्यांच्या रथात बसून स्वारी दौडत येणार. तर चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी! सशाला कडेवर घेऊन हरणांची जोडी ओढत असलेल्या गाडीतून तो विहार करणार. सगळंच किती काव्यात्मक?

एकंदरीतच सूर्य म्हणजे एक बलशाली, पराक्रमी, तेजस्वी, डोळे दिपवून टाकणारे व्यक्तिमत्व. फार जवळ गेल्यास  त्याच्या दाहकतेमुळे चटके बसण्याची भीती वाटते. अशा महान लोकांपासून आपण सर्वसामान्य पामर शक्य तोवर एक सुरक्षित अंतर ठेवून दुरूनच त्यांना साष्टांग दंडवत घालतो. तर चन्द्र अत्यंत मोहक, शांत, शीतल, हवाहवासा वाटणारा. त्याच्याकडे पहात रहावे, त्याच्या चांदण्यात चिंब भिजावे असे वाटते. तिथे नमस्काराचा आणि प्रार्थनेचा सोपस्कार किती कृत्रिम आणि औपचारिक वाटेल नाही कां?
             (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: