तोच चन्द्रमा नभात – भाग ११

तोच चन्द्रमा नभात – भाग ११
पौर्णिमेचे उत्सव
 
भारतीय कालगणनापध्दतिचा सगळ्यात चांगला उपयोग निरनिराळे उत्सव साजरे करण्यासाठी आणि त्या निमित्ताने लोकांना एकत्र आणण्यासाठी केला गेला. आपले बहुतेक सारे उत्सव शुक्लपक्षामध्ये येतात. या पक्षात सूर्यास्ताच्या वेळी आकाशात चन्द्रमा विराजमान झालेला असतो आणि त्याच्या मंद प्रकाशात उत्सवाचा जल्लोष रात्री काही काळपर्यंत लांबवता येतो. प्रतिपदेला गुढी पाडवा, द्वितियेला भाऊबीज, अक्षय तृतिया, गणेश चतुर्थी, नाग पंचमी, चंपा शष्ठी, रथ सप्तमी, दुर्गाष्टमी, रामनवमी, विजया दशमी वगैरे सण वेगवेगळ्या तिथींचे दिवशी ठेवण्याच्या मागे कदाचित या निमित्ताने सगळ्या तिथींची नांवे लोकांच्या तोंडात बसावी असा उद्देश तर नसेल? देवीचे नवरात्र, गुजराथी लोकांचा गरबा, बंगाली लोकांची दुर्गापूजा, उत्तर भारतीयांची रामलीला, पंजाबी लोकांची बैसाखी इत्यादि सगळे महत्वाचे सण शुक्ल पक्षातील चांदण्यातच रंगतात. पौर्णिमेच्या पूर्ण चन्द्राचे आकर्षण तर इतकं जबरदस्त आहे की जवळ जवळ प्रत्येक पौर्णिमा एक उत्सव म्हणूनच साजरी केली जाते. या प्रथा अगदी प्राचीन कालापासून आजतागायत अव्याहतरीतीने चालत आल्या आहेत.

चैत्र – हनुमान जयंति
वैशाख – बुध्द पौर्णिमा
ज्येष्ठ – वटसावित्री
आषाढ – गुरुपौर्णिमा
श्रावण – रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा
भाद्रपद – अनंत चतुर्दशी(आदले दिवशी)
आश्विन – कोजागरी  पौर्णिमा
कार्तिक – त्रिपुरारी पौर्णिमा
मार्गशीर्ष – दत्त जयंति
फाल्गुन – होळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: