तोच चन्द्रमा नभात – भाग १३

तोच चन्द्रमा नभात – भाग १३
प्राचीन पाश्चात्य खगोलशास्त्र
 
आपल्या पंडितांनी ज्योतिषशास्त्राचा मार्ग धरल्यावर जगातल्या सगळ्याच घटनांचे नियंत्रण आकाशातले ग्रह करतात ही समजूत रूढ झाली. आपल्या आयुष्याच्या नाड्याच त्यांच्या हातात आहेत म्हटल्यावर मग त्या ग्रहांची स्वतःची चाल चलणूक कशी आहे याची चौकशी करायचे धारिष्ट्य कोण करील ? त्यामुळे सूर्य, चन्द्र, मंगळ, शनि वगैरेंच्या भ्रमणाचा बारकाईने अभ्यास जरी होत राहिला तरी त्यामागील शास्त्रीय कारणांचा फारसा विचार झाला नसावा. आकाशांतले असंख्य तारे सतत एकाच गतिने पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात तर सूर्य, चन्द्र आणि इतर ग्रह वेगवेगळ्या गतिने का जात असतील? ते स्वयंभू देवच आहेत म्हटल्यावर प्रश्नच मिटला. त्यांना वाटेल तेंव्हा त्यांनी जलद धांवावे, वाटल्यास एखाद्या राशीत दीर्घकाळ रेंगाळावे नाहीतर वक्री होऊन चक्क उलट दिशेला जावे. त्यांची मर्जी!

आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रम्हगुप्त व भास्कराचार्य या पंडितांनी याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता व त्यांना यामागचे रहस्य समजले होते असा दावा आजकालचे कांही विद्वान करतात. पण यातल्या कोणच्या शास्त्रज्ञाने कशाच्या आधारावर कोणचा सिध्दांत मांडला याची निश्चित माहिती मला समजू शकेल अशा सरळ सोप्या भाषेत कुठे मिळाली नाही. त्यामुळे या थोर शास्त्रज्ञांचा फक्त सादर नामनिर्देश करून पुढे जाणे मला भाग आहे.

युरोपातल्या पंडितांनी मात्र या रहस्याचा पाठपुरावा केला. सर्व आभाळ हे दिवसा निळे आणि रात्री काळे दिसणारे एकच घुमटाकृति छप्पर आहे अशी पूर्वापार समजूत होती. अरिस्टॉटल या ग्रीक तत्वज्ञान्याने अशी कल्पना मांडली की ते एकापलीकडे एक अशा अनेक पारदर्शक घुमटांनी (किंवा चक्रांनी) बनलेले आहे व एकेका घुमटामध्ये (किंवा चक्रांमध्ये) एकेक ग्रह बसवलेला आहे. सर्वात बाहेरच्या घुमटावर तारका आहेत.  हे सगळे घुमट अदृष्य अशा छोट्या चक्रांनी एकमेकांना जोडलेले असून या सगळ्याच्या बाहेरून कालचक्र या सर्वांना फिरवत असते. अवकाशाच्या  रचनेच्या या कल्पनेमध्ये ग्रहांच्या वेगवेगळ्या गतींचे स्पष्टीकरण मिळत असले तरी वक्रगतीचा खुलासा होत नव्हता.

यावर कुणीतरी अशी भन्नाट कल्पना काढली की ग्रह हे घुमटांमध्ये किंवा मुख्य चक्रामध्ये बसवलेले नसून त्या काल्पनिक अदृष्य छोट्या उपचक्रांना (एपिसायक्लिक रीतीने) जोडलेले आहेत. त्यामुळे मुख्य घुमटांच्या तुलनेने ते मागे पुढे होऊ शकतात. टॉलेमी या विद्वानाच्या नावाने प्रसिध्द झालेले अवकाशाचे हे मॉडेल जवळ जवळ हजार वर्षे चालले.

                                                                                           क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: