तोच चन्द्रमा नभात – भाग २६

तोच चन्द्रमा नभात – भाग २६
संस्कृत वाङ्मयातील चन्द्र

आकाशात चमकणारे असंख्य तारेसुध्दा आपल्या सूर्यासारखे देदिप्यमान आहेत, मंगळ, बुध, गुरु वगैरे ग्रह आपल्या पृथ्वीसारखे दगडमातीचे प्रचंड गोल आहेत आणि चन्द्र एक भयाण, ओसाड वाळवंटाचा प्रदेश आहे वगैरे शास्त्रीय माहिती आपल्या ऋषिमुनींना त्यांच्या अलौकिक दिव्यदृष्टीने किंवा अंतर्ज्ञानाने प्राप्त झाली होती असे गृहीत धरले तरी तसा उल्लेख आपल्या परिचयाच्या कुठल्या प्राचीन वाङ्मयात आढळत नाही. आपल्याला माहीत असलेले संस्कृत वाङ्मय म्हणजे मुख्यतः धार्मिक विधीचे मंत्र व स्तोत्रे आणि सुभाषिते. यामध्ये चन्द्राचा उल्लेख कशा प्रकारे होतो ते पाहू.

पुरुषसूक्तामध्ये एक श्लोक असा आहे.
चन्द्रमा मनसो जातः चक्षौः सूर्यो अजायत । मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायतः।
नाभ्यादासीदंतरिक्षं शीर्श्णौ द्यौ समवर्तत । पद्भ्याम् भूमीर्दिशः श्रोत्रात् तथा लोकामकल्पयम् ।।
विश्वाची उत्पत्ति परमेश्वराच्या शरीराच्या भिन्न अंगांपासून झाली अशी कल्पना करून त्याच्या मनापासून चन्द्र, डोळ्यातून सूर्य, मुखातून इन्द्र व अग्नि असे करीत इतर अवयवापासून काय काय निर्माण झाले ते या श्लोकात सांगितले आहे.

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । हा श्लोक आपण प्रत्येक लग्नसमारंभात ऐकतो. ज्या क्षणी देवाचे स्मरण कराल त्या क्षणी तुम्हाला ताराबल, चंद्रबल, विद्याबल, दैवबल वगैरे सगळे बल मिळेल, त्यासाठी मुहूर्ताची वाट पहात बसायची गरज नाही असा याचा अर्थ आहे. 

येषां बाहुबलं नास्ति येषां नास्ति मनोबलम् । तेषां चंद्रबलं देवः किंकरोत्यंबरे स्थितम्।।
ज्या माणसाचे दंड बळकट नाहीत, मन खंबीर नाही अशा दुर्बळाला दूर आभाळात राहणारा चन्द्र कसली कप्पाळ शक्ती देणार आहे असे दुस-या एका सुभाषितामध्ये अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितले आहे.  या सर्व शिकवणीवरून लोक कधी बोध घेणार?

नवग्रहस्तोत्रामध्ये चंद्राबद्दल म्हंटले आहे,
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णवसंभवम् । नमामि शशिनंसोमम् शंभोर्मुकुटभूषणम् ।।
यात चंद्राच्या शुभ्रतेचे वर्णन आहे, तसेच त्याच्या उत्पत्तीची वेगळीच कथा आहे. समुद्रमंथनात तो क्षीरसागरातून निघाला आणि शंकराच्या मुकुटाचे भूषण बनून राहिला असे या श्लोकात सांगितले आहे.

गणपति अथर्वशीर्षामध्ये एक ओळ आहे.
त्वंब्रम्हास्त्वंविष्णुस्त्वम् रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वंवायुस्त्वं सूर्यस्त्वंचन्द्रमास्त्वम् ब्रम्हभूर्भुवःस्वरोम्।
ब्रम्हा, विष्णु, रुद्र, अग्नि, वायु, सूर्य व चन्द्र या सर्व देवता तूच आहेस,  तुझीच ही वेगवेगळी रूपे आहेत अशी श्रीगणेशाची स्तुति या श्लोकात केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: