उजवा मेंदू आणि डावा मेंदू

Brain

आपल्या मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागाचे नियंत्रण करतो आणि डावा भाग उजव्या बाजूचे असे शाळेत असतांना शरीरशास्त्राच्या अभ्यासात शिकलो होतो. ज्याच्या मेंदूचा उजवा भाग अधिक सक्षम असेल तो माणूस डावखोरा होतो असे तेंव्हा वाटत असे. डावखोरी माणसे अधिक कलासक्त असतात असे कांहीसे ऐकले होते. या विषयावर अधिकाधिक संशोधन झाल्यावर या दोन्ही भागांमध्ये कामाची वाटणी झाली आहे असे समजले जाते. त्यातून खाली दिलेले निष्कर्ष काढले गेले आहेत.
डावा मेंदू तर्कशुद्ध विचार करतो आणि उजवा भावनांचा.
डावा मेंदू तपशीलात जातो आणि उजवा सम्यक दृष्य पाहतो
डावा मेंदू वस्तुस्थिती पाहतो आणि उजवा कल्पनाविलास
डावा मेंदू शब्द व भाषा जाणतो आणि उजवा खुणा व चित्रे
डावा मेंदू गणित व विज्ञान समजून घेतो आणि उजवा तत्वज्ञान आणि धर्म
डावा मेंदू आकलन करतो आणि उजवा ग्रहण करतो
डावा मेंदू जाणतो आणि उजवा विश्वास ठेवतो
डावा मेंदू पोच देतो आणि उजवा दाद देतो
डाव्या मेंदूला पॅटर्न समजतात तर उजव्याला ठिकाण
डावा मेंदू वस्तूचे नांव जाणतो आणि उजवा तिचे गुणधर्म
डावा मेंदू वस्तुनिष्ठ विचार करतो आणि उजवा कल्पनारम्य
डावा मेंदू धोरण ठरवतो आणि उजवा शक्यता आजमावतो
डावा मेंदू प्रॅक्टिकल असतो उजवा मनस्वी
डावा मेंदू सुरक्षितता पाहतो आणि उजवा धोका पत्करतो.
आपण यातल्या सगळ्याच गोष्टी करतो कारण आपल्याला दोन्ही भाग असतात. आपण त्यातल्या एकाला ढोबळपणे बुद्धी म्हणतो आणि दुस-याला मन. पण या दोघांमध्ये अनेक वेळा परस्परविरोध होत असतो. कधी मन उधाण वा-यासारखे स्वैरपणे भरकटत जाते तर कधी उभ्या पिकात शिरलेल्या ढोरासारखे वढाय वढाय होते. तेंव्हा बुद्धी त्यावर अंकुश ठेवते. जेंव्हा समजते पण उमगत नाही त्या वेळेस बुद्धीला पटलेल्या गोष्टी मानायला मन तयार होत नाही. कधी कधी तर बुद्धीला अनाकलनीय असलेल्या गूढ गोष्टी मनाला जाणवतात. या प्रकारे मन व बुद्धी कधी एकमेकींना पूरक ठरतात तर कधी त्यांच्यात रस्सीखेच होते. पण अखेरीस ज्या माणसाच्या मेंदूचा जो भाग अधिक बलवान असेल त्याच्या प्रभावाखाली तो वागतो.
मेंदूचा उजवा आणि डावा भाग यात योग्य तेवढे संतुलन आणि सहकार्य नसेल तर त्यातून डिस्लेक्शिया यासारख्या समस्या होतात. याच विषयावर काढलेला तारे जमीनपर हा अत्यंत लोकप्रिय झालेला चित्रपट सर्वांनी पाहिला असेलच. अशा जमीनीवर राहून गेलेल्या काही अत्यंत तेजस्वी ता-यांबद्दल थोडी माहिती मी माझ्या एका वेगळ्या ब्लॉगवर धेणार आहे. ज्या काळात हा चित्रपट प्रसारित झाला त्या वेळी मी हा लेख लिहिला होता. यात दिलेली माहिती मला आलेल्या एका ढकलपत्रावरून (फॉरवर्डेड ई-मेलवरून) घेतली आहे. त्याची शहानिशा करण्याचा कोणताही मार्ग माझ्याकडे नाही.

2 प्रतिसाद

  1. Khup chan information ahe

  2. […] या विषयावर अधिक माहिती माझ्या या लेखात दिली आहे. उजवा मेंदू आणि डावा मेंदू […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: