महाशिवरात्र

 

महाशिवरात्र हा उत्सव किंवा हे व्रत भारताच्या बहुतेक सगळ्या भागांमध्ये पाळले जाते. शंकराच्या सगळ्या  प्रमुख देवालयांमध्ये दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होते. कुंभमेळ्याच्या ठिकाणी गंगेत स्नान करायला येणाऱ्या भाविकांची संख्या आता लाखांमधून कोटींमध्ये गेली आहे. इतर ठिकाणीसुध्दा जत्रा भरतात. लहान लहान गांवांमधल्या जंबूकेश्वर, पाताळेश्वर, भूलिंगेश्वर, धारेश्वर अशासारखी नावे असलेल्या देवळांमध्ये सुध्दा या दिवशी अभिषेक, महापूजा, महाआरत्या वगैरे कार्यक्रम असतातच.

————————————-

संपादन दि.२०-०२-२०२० : श्रीशिवस्तुति, महाशिवरात्रीविषयीची माहिती आणि शिवलीलामृतामध्ये दिलेली कथा :

https://www.marathimati.com/2018/11/maha-shivaratri-festival.html

—————————————————–

या लेखासोबत पुढील माहिती संग्रहित केलेली आहे.  .. बारा ज्योतीर्लिंगे, निर्वाणषटकम्

याशिवाय  रावणविरचित शिवतांडवस्तोत्र या दुव्यांवर दिले आहे : https://anandghare2.wordpress.com/2014/02/26/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/

—————————————————————

पाच वर्षांपूर्वी महाशिवरात्रीला आमच्या घराजवळच्या एका शिवमंदिरात दर्शनाला गेलो असतांना तिथे एक पत्रक वाटले जात होते. ते घरी आणून सहज वाचून पाहिले आणि इंटरेस्टिंग वाटले म्हणून ठेऊन दिले होते. जुने कागद पहातांना ते नेमके या शिवरात्रीला हातात आले. त्यात चार मुख्य परिच्छेद आहेत. त्यांचा सारांश असा आहे.

ईश्वराचे नांव, गुण आणि स्वरूप
ईश्वराचे वास्तविक नांव शिव असे आहे. अर्थात तो मंगलकारी, कल्याणकारी असा आहे. ज्योतिर्बिंदू हे त्याचे रूप आहे म्हणून सर्व धर्मात त्याच्या प्रकाशमय रूपाची पूजा केली जाते.

शिवाची दिव्य कर्तव्ये
ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन सूक्ष्म देवतांद्वारे विश्वाची उत्पत्ती, पालन आणि विनाश ही तीन कर्तव्ये त्रिमूर्ती शिव करत असतो. यांचे प्रतीक म्हणून शिवलिंगावर त्रिपुंड काढतात आणि बेलाच्या पानाचे त्रिदळ त्याला अर्पण करतात. (शिव म्हणजे फक्त शंकर किंवा महेश असेच मी समजत आलो आहे. त्याशिवाय शिव म्हणजे मंगल असा एक अर्थ माहीत आहे)

महाशिवरात्रीचे रहस्य
इथे रात्र या शब्दाचा अर्थ सूर्य मावळल्यानंतर झालेला काळोख एवढा सीमित नसून अज्ञान व अत्याचार यांचा अंधःकार असा आहे. या अंधःकाराचा नाश करून शिवाचे दिव्य अवतरण म्हणजे शिवरात्र.

आजच्या काळाचे महत्व
कलियुगाचा अंधःकारमय काळ आता संपत आला आहे. अधर्माचा विनाश करून धर्माची स्थापना करण्याचे दिव्य कर्तव्य पार पाडण्यासाठी शिवभगवान अवतीर्ण झाले आहेत. कलियुग संपून सत्ययुग सुरू होत आहे.

याबद्दल अधिक माहितीसाठी “खालील ठिकाणी संपर्क करावा” असे लिहून कांही पत्ते दिले होते. पण माझ्या मनातला अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे इतर कांही खात्रीलायक आणि सोयिस्कर मार्ग जास्त आकर्षक वाटल्यामुळे मी त्या पत्त्यावर दिलेल्या जागी कांही गेलो नाही. शिवाय एवीतेवी सत्ययुग येणारच आहे तर त्याचा फायदा आपल्यालाही आपोआप मिळेलच अशी आशा आहे.

Shivaratri

Shivaratri02

भारतामधील दूरदूरच्या भागांमध्ये बांधलेली शंकराची मुख्य देवालये बारा ज्योतीर्लिंगे आहेत. त्यांची नावेही खाली दिली आहेत.
भारतात शंकराची बारा ज्योतिर्लिंगे नांवाची अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. त्या प्रत्येक क्षेत्राला पुराणातल्या कथेचा दाखला दिला जातो. ती उत्तरांचलापासून ते तामिलनाडूपर्यंत विस्तीर्ण प्रदेशात विखुरलेली आहेत. शिवाची आराधना भारताच्या बहुतेक सर्व भागात केली जात होती असे यावरून दिसते. त्यांची नांवे एका स्तोत्रात गुँपलेली आहेत. ते खाली दिले आहे. या बारा ज्योतिर्लिंगाशिवाय कर्नाटकातील गोकर्ण येथील महाबळेश्वर आणि नेपाळातील पशुपतीनाथ वगैरे मोठी, पुरातन आणि प्रसिध्द अशी अनेक देवस्थाने आहेत.

द्वादशज्योतिर्लिङ्गानि  – बारा ज्योतीर्लिंगे 

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्।
उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्।
सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।
हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात: पठेन्नर:।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

बारा ज्योतिर्लिंगांची स्थाने
१.सोमनाथ ….सौराष्ट्र …. गुजरात
२.मल्लिकार्जुन ..श्रीशैल्य … आंध्रप्रदेश
३.महाकाल … उज्जैन … मध्यप्रदेश
४.ममलेश्वर .. ओंकारेश्वर .. मध्यप्रदेश
५.वैद्यनाथ … परळी …. महाराष्ट्र
६.भीमाशंकर .. डाकिनी(पुण्याजवळ) महाराष्ट्र
७.रामेश्वर … सेतुबंध …. तामिलनाडु
८.नागेश्वर … दारुकावन (औंढ्या नागनाथ) महाराष्ट्र
९.विश्वेश्वर … वाराणसी … उत्तर प्रदेश
१०.त्र्यंबकेश्वर .. नाशिक जवळ . महाराष्ट्र
११.केदारनाथ .. हिमालय .. उत्तरांचल
१२.घृष्णेश्वर … वेरूळ … महाराष्ट्र
————————-

आदिशंकराचार्यांनी लिहिलेले निर्वाणषटकम् हे अप्रतिम स्तोत्र किंवा काव्य खाली दिले आहे, तसेच त्याचा इंग्रजी अनुवादही दिला आहे.

निर्वाण षटकम्

मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं ।  न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रौ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। १ ।।

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः।
न वाक्पाणिपादम् न चोपस्थपायु । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। २ ।।

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ । मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ३ ।।

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं । न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ४ ।।

न मे मृत्युशंका न मे जातिभेदः । पिता नैव माता नैव न जन्मः।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ५ ।।

अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्।
न चासङ्गत नैव मुक्तिर्न बन्धः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ६ ।।

——————————————————————–
I am not the thought, intellect, ego, life;
I have no ears, tongue, nostrils, eyes;
I am not the five great elements (ether, earth, fire, air, water);
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।1।।

I am not the vital air nor do I have anything to do with the physiological functions of the body;
I am not the seven-fold material* nor am I attached to the five sheaths**;
I am not the five organs of action (Speech, hands, legs, genital organs, anus)
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।2।।

I have neither passion nor hatred, neither greed nor covetousness;
I have neither arrogant vanity nor do I compete with anyone;
I don’t need the four purposes of life (dharma: virtue, arTha: wealth, kAma: desire, mokSha: liberation);
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।3।।

I am free of sin or merit, joy or sorrow;
I know no hymns, have no pilgrimage to make, I know no scriptures, nor have I anything to gain from rituals;
I am neither the food (the experience) nor the taster (the experiencer) nor the cook (experience-giver);
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।4।।

I have no doubt of death, nor have I any caste distinction;
I have neither father nor mother, I was never born!
I have no kith or kin, no teacher or disciple;
I am pure consciousness, bliss, the self, purity alone. ।।5।।

I am free from thoughts, formless is my only form;
I am the vitality behind the sense organs of all;
Neither attached to anything nor free from everything, all inclusive I am;
I am pure consciousness, bliss, the self, purity alone.  ।।6।।

Note:
*The seven-fold material that goes into the building up of the body: Marrow, bone, fat, flesh, blood, inner skin, outer skin
**The five sheaths of personality: Anatomical structure, Physiological structure, Mental sheath, Intellectual sheath, Bliss sheath


दि.२१-०२-२०२० नवी भर

श्रीशिवस्तुति

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥
जटा विभूति उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥
वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥
उदार मेरु पति शैलजेचा । श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधीचा गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥
ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरीं दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ ॥
कर्पूरगौरी गिरिजा विराजे । हळाहळें कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदुःखे स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥
स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देव चूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥
भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९ ॥
नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १० ॥
भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११ ॥
इच्छा हराची जग हे विशाळ । पाळी रची तो करि ब्रह्मगोळ ।
उमापति भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२ ॥
भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३ ॥
प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदी वाहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४ ॥
कीर्ती हराची स्तुति बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५ ॥
सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरुपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६ ॥
सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशिकोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७ ॥
कर्पूरगौर स्मरल्या विसांवा । चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहीत सुवना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८ ॥
विरामकाळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनें चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९ ॥
सुखावसाने सकळ सुखाची । दुःखावसाने टळती जगाचीं ।
देहावसाने धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २० ॥
अनुहात शब्द गगनी न माय । त्याने निनादें भव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१ ॥
शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळी असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२ ॥
पीतांबरे मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३ ॥
जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंची तुटली उपाधी ।
शुद्धस्वरें गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४ ॥
निधानकुंभ भरला अभंग । पाहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुर चक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५ ॥
मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६ ॥
जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं ।
प्रताप सूर्यशरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७ ॥
अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकसे ।
नेई सुपंथे भवपैलतीरीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८ ॥
नागेशनामा सकळा जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।
पंचाक्षरी घ्यान गुहाविहारीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९ ॥
एकांति ये रे गुरुराज स्वामीं । चैतन्यरुपीं शिवसौख्य नामीं ।
शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३० ॥
शास्त्राभ्यास नको श्रुति पढुं नको तीर्थासि जाऊं नको ।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ।
काळाचे भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडू नको ॥ ३१ ॥

॥ इति श्रीशिवस्तुति ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: