संगणक गीते

होळीच्या निमित्याने संगणकाने (त्याच्या वतीने मीच) केलेली काही विडंबन गीते. भागांच्या पाचव्या शतकामधला हा पहिला भाग देतांना मला खूप आनंद होत आहे. सर्व वाचकांचे आभार आणि सर्वांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा.

Holi C

उषःकाल होता होता काळरात्र झाली ।
अरे पुन्हा आणा डेटा फाईल भ्रष्ट झाली ।।
——————–
थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता ।
कंट्रोल आल्टर डिलीट करते मी आता ।।
————————————–
फ्लॉपीची तिजोरी डेटाचाच ठेवा ।
उघड फाईल देवा आता उघड फाईल देवा ।।
————————————–
विसरशील खास मला दृष्टीआड होता ।
कट करुनी क्विट करशील पेस्ट न करता ।।
————————————
इथेच आणी या बांधावर अशीच श्यामल वेळ ।
रीड ओन्ली सखीसवे किती रंगणार खेळ ।।
——————————————-
नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचिला पौंड ।
फुकट घेतला अकौंट । ई मेलचा फुकट घेतला अकौंट ।।
कुणी म्हणे ही असेल चोरी ।
कुणा वाटते असे उधारी ।
विपुल वायफळ जाहीरातींचा सोसतो ना मी लोट ।।
————————————–
धागा धागा अखंड विणुया ।
वेबसाईटचे जाल रचूया ।।
एचटीएमेलचा धागा धरुनी ।
जावास्क्रिप्टचे सूत्र गुंफुनी ।
हायलाइटेड इंडेक्स करूया ।। वेबसाईटचे …..
टेक्स्ट लिहूया ज्ञानवर्धक ।
मुद्देसूद पण ध्यानाकर्षक ।
बुलेटेड फॉर्मॅट धरूया ।। वेबसाईटचे …..
इन्फॉर्मेशन सर्व जमवुनी ।
क्लासिफिकेशन त्याचे करुनी ।
टेबल्समध्ये नीट मांडुया ।। वेबसाईटचे …..
ग्राफिक्सचा करू सढळ वापर ।
एक चित्र जणु शब्द हजार ।
अनिमेशन फ्लॅशने करूया ।। वेबसाईटचे …..
वेबसाईटचे विस्तृत प्रांगण ।
साईटमॅपने करू आरेखन ।
क्रॉसलिंक्स सर्वत्र देऊया ।। वेबसाईटचे …..
सर्फिंगकरुनी इंटरनेटवर ।
साइट्स शोधू अन्य मनोहर ।
दुवे तयांचेही देऊया ।। वेबसाईटचे …..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: