मी कोण आहे ? …….
मी
एक रिकामटेकडा, निरुद्योगी, निरुपद्रवी …. आणि कदाचित निरुपयोगी … इसम
कोणाला माझी गरज नाही म्हणून खंत करण्यापेक्षा माझे सारे जग स्वतःची काळजी घेण्याएवढे समर्थ झाले आहे असे म्हणून सुखावणारा ….
आपला कोणाला काही उपयोग नाही असे वाटण्याच्या आधीच संगणकावर बसतो आणि आपले अनुभव किंवा विचार खालील जागी व्यक्त करतो.
या स्थळावरील काही निवडक लिखाण त्याची वर्गवारी करून या ठिकाणी देत आहे. हे काम करतांना त्याचे संपादन करून ते अद्ययावत करण्याचा प्रयत्न करतो आहे.
मिसळपाव, उपक्रम, ऐसी अक्षरे, मी मराठी आदि काही इतर संकेतस्थळांवरही अधून मधून लिहीत असतो.
कदाचित कोणाला ते वाचून दोन आनंदाचे क्षण मिळतील असी आशा करतो.
आंतर्जालावर भटकत असतांना जे शंख, शिंपले आणि चकाकणारे खडे वेचून घ्यावेसे वाटतात आणि ईमेलमधून ज्या चमकदार उल्कांचा व गारांचा वर्षाव होतो त्यांचा संग्रह एका जागी करून ठेवायच्या विचाराने मी शिंपले आणि गारगोट्या नावाचा वेगळा ब्लॉग सुरू केला आहे. तो या ठिकाणी वाचायला मिळेल.
http://anandghare.wordpress.com/about/
धन्यवाद.
jst wow…
सेजलताई, हे पान चुकून रिकामे राहिले होते की संगणकातल्या एकाद्या घोटाळ्यामुळे ते तसे राहिले होते हे मला ठाऊक नाही. पण आपण ते माझ्या निदर्शनाला आणून दिल्याबद्दल आभारी आहे. हे दाखवण्याची पध्दतही आवडली.
तुमची अनुदिनी वाचली. वाचताना खूप मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण माहिती
मिळतेय. ब्लोगची वैज्ञानिक माहिती खूप सोपी आहे हळू हळू मला मराठीतले सगळे ब्लोग वाचण्याचे वेड लागणार बहुतेक. माझी किमान ५००० च्या वर अवांतर पुस्तक वाचून झाली आहेत. पण font size लहान असल्यामुळे पुस्तक वाचनाला मर्यादा येतात म्हणून ब्लोग आणि रोजचे वर्तमान पत्र आता इंटरनेटवरच वाचतो. माझे जे वाचन झाले त्यातही मी सृष्टीच्या या अद्भुत गोष्टी का आणि कशा घडतात या विषयीचे कुतूहल समजण्यासाठी करत असतो. असो हि अनुदिनी मला माझ्या मुलाचे असे का होते सारखे काही प्रश्न ; जे मला माझ्या लहानपणी पडत असत ते सोडवण्या साठी उपयोगी पडेल.
धन्यवाद!
आम्ही एक स्वछंद जीवन जगलो तो अनुभव माझी पत्नी सौ . वृषाली गंभीर ने संकलित केला आहे. नाव जमीनदोस्त ते जमीन दोस्त. जर आपण वाचून प्रतिक्रिया दिल्या तर उपयोगी पडतील.
कळावे. मिलिंद ९०२८०९११४९, वृषाली ९८५०१९२१६०
आपला ब्लॉग उत्कृष्ट.पावसाची गाणी खूपच छान !– रश्मी घटवाई
पावसाची गाणी नेटवर शोधतांना आपला ब्लाँग गवसला. जणू रेताड वाळवंटात फिरतांना मरूउद्यान दिसावे…..
खूप छान.
आनंद झाला.
great job, aprtim
धन्यवाद .
मिसळ पाव वर तुमची सहस्त्र चंद्र दर्शनाची प्रतिक्रिया वाचली . पण detail ब्लॉग काही उघडता आला नाही.
१००० वि पौर्णिमा नक्की कधी येते ते जन्म तारखेवरून काढण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
आपली प्रतिक्रिया / सूचना जाणून घ्यायला आवडेल.
https://textbookscience.pythonanywhere.com/
धन्यवाद. मी गेली काही वर्षे मिसळपाववर लेखन केलेले नाही. माझी हा प्रतिक्रिया खूप पूर्वी दिलेली असावी. माझा कुठला ब्लॉग उघडला नाही ? तुम्ही केलेला उपक्रम खूपच चांगला आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळावा अशी सदीच्छा.
सहस्त्र चंद्र दर्शना बद्दल तुम्ही लिहिलेले लिखाण कुठे वाचायला मिळेल? त्याची लिंक पाठवावी